मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Cut : मुंबईनंतर आता पुण्यातही पाणीबाणी; शहरातील ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut : मुंबईनंतर आता पुण्यातही पाणीबाणी; शहरातील ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 29, 2022 08:21 AM IST

Water Cut In Pune : मुंबईत आजपासून ४८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता पुण्याही अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  Water Cut In Pune Today
Water Cut In Pune Today (HT)

Water Cut In Pune Today : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय आता महाराष्ट्रातील शैक्षणिक सिटी आणि आयटी सिटी अशी ओळख असलेल्या पुण्यातही पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. कारण आता पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता पुणेकरांना पाणीपुरवठा बंद झाल्यामुळं मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड आणि शिवाजीनगर या भागांमध्ये पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पुणेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा...

पुण्यात महापालिकेनं शहरातील बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा बंद केल्यानं लोकांना कमीत कमी पाण्यात दैनंदिन गरजा भागवाव्या लागणार आहेत. याशिवाय उपलब्ध असलेलं पाणी जपून वापरण्याचं आवाहन शहरवासियांना केलं जात आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये एकाचवेळी दोन दिवसांची पाणीबाणी जारी करण्यात आल्यानं लोकांना पुढील ४८ तास पाणी जपून वापरावं लागणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग