मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat Express : मंबई ते सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express : मंबई ते सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 18, 2022 09:51 PM IST

देशात सात मार्गावर वंदे भारत या वेगवान गाड्या सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातमुंबई ते सोलापूर मार्गावरही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस(vande bharat express) लवकरच धावताना दिसेल.

वंदे भारत एक्सप्रेस
वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express : देशात सात मार्गावर वंदे भारत या वेगवान गाड्या सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात मुंबई ते सोलापूर मार्गावरही ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस (vande bharat express) लवकरच धावताना दिसतील. याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  ही एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मुंबई ते सोलापूर प्रवास कमी वेळात व जलद गतीने होणार आहे. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी ‘वंदे भारत’ रेल्वे मुंबई ते सोलापूर मार्गावर सुरू करण्याची मागणी केली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात बैठक झाली. बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे आशियातील सर्वांत मोठ्या अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या बैठकीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. 

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. 

IPL_Entry_Point

विभाग