मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : हा तर गाजर-हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Uddhav Thackeray : हा तर गाजर-हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 09, 2023 06:49 PM IST

Uddhav Thackeray on Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारनं सादर केलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा गाजर-हलवा अर्थसंकल्प असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Reaction on Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारनं सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर-हलवा अर्थसंकल्प असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व विधान परिषदेत दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. एका वेगळ्या परिस्थितीत सत्तेवर आलेल्या व महापालिका निवडणुका कधीही होतील अशी स्थिती असताना हे सरकार कसा अर्थसंकल्प मांडणार याविषयी उत्सुकता होती. अपेक्षेनुसार सरकारनं सर्व समाजघटकांना खूष करण्याचा प्रयत्न केला. महिला, वृद्धांसह विविध वर्गांवर सवलीतींची बरसात केली.

विरोधकांनी मात्र हा केवळ आकड्यांचा खेळ असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'हा समाजातील सर्व घटकांना मधाचं बोट लावण्याचा, त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला आणि मुंबईत गडगडाट झाला. गरजेल तो पडेल काय असं म्हणतात तसा हा अर्थसंकल्प आहे. हा गाजर-हलवा अर्थसंकल्प आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'महाविकास आघाडी सरकारच्या अनेक योजना नाव बदलून सादर केल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी त्यांच्या हमी भावाचं काय यावर सरकार मौन असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

अर्थसंकल्पीय भाषणात मोदींचा उल्लेख, उद्धव ठाकरे म्हणाले…

अर्थसंकल्पीय भाषणात अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करण्यात आला. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, याच पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली होती. त्याचं काय झालं?,' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला.

IPL_Entry_Point

विभाग