मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दाम्पत्याचा जागीच मृत्यू; २ वर्षांचा चिमुकला झाला पोरका

Amravati Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दाम्पत्याचा जागीच मृत्यू; २ वर्षांचा चिमुकला झाला पोरका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 09:50 AM IST

Amravati Accident : एका भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यात देवरी फाट्याजवळ असलेल्या तेलाई नाल्याजवळ घडली.

Two Wheeler Accident
Two Wheeler Accident (HT)

अमरावती : एका भरधाव ट्रकने समोरून जात आसलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर त्यांचा २ वर्षाचा मुलगा या आपघातून सुदैवाने बचावला. मात्र, आई वडील मृत्युमुखी पडल्याने तो पोरका झाला आहे. हा अपघात अमरावती जिल्ह्यात देवरी फाट्याजवळ असलेल्या तेलाई नाल्याजवळ घडला.

ट्रेंडिंग न्यूज

विजय अण्णाजी शिंदे (वय २८), व ऋतुजा विजय शिंदे (वय २४, रा. जळका जगताप, ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या पती आणि पत्नीची नावे आहेत. तर देवांशु विजय शिंदे (वय २) हा या दाम्पत्याचा चिमुकला मुलगा जखमी झालाआहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय शिंदे त्यांची पत्नी ऋतुजा हे मुलगा देवांशु याच्यासह त्यांच्या दुचाकीवरून जळका जगताप येथून देवरी येथे जात होते गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ते शिराळा मार्गे देवरी येथे जात असतांना त्यांचा मागून भरधाव वेगात येणारा ट्रक हा अनियंत्रित झाला. यामुळे तो पुढे जाणाऱ्या शिंदे यांच्या दुचाकीला जाऊन धडकला.

या अपघातामध्ये विजय आणि ऋतुजा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकला देवांशु जखमी झाला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तातडीने माहुली जहागीर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच माहुली जहागीर पोलीस स्टेशन पीएसओ मिलिंद सरकटे, ए एस आय टोकमुरके, ए एस आय अघाडे, हे कॉ धर्माळे, पो कॉ विनोद वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने देवांशु याला जवळ घेत मृतदेह हे दवाखान्यात पाठवले.

IPL_Entry_Point

विभाग