Gautam Navlakha : नवलखा यांच्या जामिनावर फेरसुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचा एनआयए न्यायालयाला आदेश
Gautam Navlakha Indian human rights activist : कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एनआयए न्यायालयाने फेटाळलेला त्यांचा जमीन अर्जावर फेरसुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई : सामाजिक कार्यकर्ते तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी असलेले गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलआ आहे. त्यांच्या जामीन अर्ज एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, हाआदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत त्यांच्या जामीन अर्जावर पुढील चार आठवड्याच्या आत फेरसुनावणी घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने ही आदेश एनआयए न्यायालयाला दिले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांच्यावर आरोप पत्र दाखल आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी जमीन अर्ज एनआयए न्यायालयात केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी ते उच्च न्यायालयात गेले. ‘नवलखा यांनी अमेरिकेत एफबीआयकडून अटक झालेल्या पाकिस्तानच्या आयएसआय एजंटशी संबंध ठेवले होते. त्यांनी त्याच्याकरिता अमेरिकेतील न्यायालयाला दया दाखवण्यासाठी अर्ज केला होता. त्या एजंटने त्यांची आयएसआयमध्ये भरती व्हावी, याकरिता त्यांची आयएसआय जनरलशी ओळखही करून दिली होती’, असा दावा करत एनआयएने नवलखा य़ांच्या अपिल अर्ज फेटाळला होता.
मात्र, हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा नवलखा यांनी त्यांचे वकील अॅड. चौधरी यांच्यामार्फत केला होता. मात्र, असे असतांनाही त्यांचा आदेश फेटाळण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने एनआयए न्यायालयाने अर्ज फेटाळण्याबाबत काही कारने स्पष्ट केले नसल्याचे सांगितले.
तसेच हे प्रकरण पुन्हा एनआयए न्यायालयाकडे जाऊन त्या न्यायालयाने कारणमीमांसेसह योग्य आदेश देण्याच्या सूचना केल्याने आता नवलखा यांच्या जामीन अर्जाचे प्रकरण पुन्हा एनआयएन च्या न्यायालयाकडे केले आहेत.