मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Railway News : परगावी जाण्यासाठी ट्रेन पकडायला पुणे रेल्वे स्थानकात जात असाल तर हे वाचा!

Pune Railway News : परगावी जाण्यासाठी ट्रेन पकडायला पुणे रेल्वे स्थानकात जात असाल तर हे वाचा!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 09:54 AM IST

Pune Railway News : पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहेत. यामुळे काही गाड्या या आता हडपसर टर्मिनलवरून सोडण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हडपसर टर्मिलवरून सुटणार गाड्या
हडपसर टर्मिलवरून सुटणार गाड्या

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार आहे. या कामाचा प्रभाव काही गाड्यांच्या सेवेवर होणार असून तो टाळण्यासाठी काही गाड्या या आता पुणे रेल्वे स्थानकाच्या जवळून वळवण्यात येत आहे. येत्या ६ मार्च पासून पुणे-सोलापूर गाडी हडपसर टर्मिनल येथून सोडण्यात येणार असून, दौंड-पुणे गाडी हडपसरपर्यंत धावणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम तब्बल २९० दिवस चालणार आहे. पुणे रेल्वे स्थानकात काम सुरू झाल्यावर या स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्या या शिवाजीनगर, खडकी, हडपसर येथून सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर स्थानकावरून आता लोकलसाठी स्वतंत्र लाइन तयार करण्यात आली आहे तर आता हडपसर टर्मिनलमधून देखील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जाणार आहे.

हडपसर टर्मिनलमधून सध्या हैदराबाद एक्स्प्रेस ही एकमेव गाडी सुटते. पुणे स्थानकात काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर आणि हडपसर या दोन टर्मिनलचा वापर रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. हडपसर रेल्वे टर्मिनल येथून गाड्या वाढविण्यास सुरूवात झाली आहे.

पुणे-सोलापूर गाडी आता हडपसर टर्मिनलवरून सकाळी ८.३५ वाजता सुटेल. दौंड-पुणे ही गाडी हडपसरपर्यंत धावेल. तिचे हडपसर टर्मिनलवर सकाळी ७.३५ वाजता आगमन होईल. दरम्यान, पुणे-फलटण या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ६.१० वाजता सुटेल आणि फलटणला सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल, असे रेल्वेने कळवले आहे.

WhatsApp channel

विभाग