मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi In Mumbai : पीएम मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल; प्रवासासाठी या मार्गांचा करा वापर

Modi In Mumbai : पीएम मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल; प्रवासासाठी या मार्गांचा करा वापर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 18, 2023 07:43 PM IST

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्यामुळं पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे.

Prime Minister Narendra Modi Mumbai Visit
Prime Minister Narendra Modi Mumbai Visit (HT)

Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळं त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर पीएम मोदींची सभा होणार असल्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी मैदानाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता मोदींच्या दौऱ्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमुळं मुंबईतील रस्त्यांवर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळं तुम्हाला उद्या मुंबईतून प्रवास करायचा असेल तर सकाळची वेळ ही योग्य ठरणार आहे. त्याचबरोबर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ जोगेश्वरी लिंक रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. ज्या लोकांना विमानानं प्रवास करायचा आहे, त्यांना मोदींच्या दौऱ्याआधी मुंबई विमानतळावर पोहचावं लागणार आहे. कारण मोदींचं मुंबईत आगमन झाल्यानंतर रस्त्यांवरील सुरक्षा वाढेल परिणामी विमानतळावर पोहचणं कठीण होणार आहे.

बीकेसी आणि गुंडवलीसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारनंतर संथ गतीनं वाहतूक सुरू असेल. एम एमआरडीए मैदान, बीकेसी मैदान, मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाड्याला मुंबई पोलिसांकडून उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस उपायुक्तांची सुरक्षेत हजेरी राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी २७ एसीपी, १७१ पोलीस निरिक्षकांसह तब्बल ३९७ पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. याशिवाय अडीच हजार पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी आणि शीघ्र कृती दलाचे जवानही सुरक्षेत तैनात असणार आहे.

IPL_Entry_Point