मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहावीचा पेपर सुटला अन् पोरींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना लोळवत लाथाबुक्क्यांनी तुडवलं
Nashik City Crime News Marathi
Nashik City Crime News Marathi (HT_PRINT)

दहावीचा पेपर सुटला अन् पोरींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना लोळवत लाथाबुक्क्यांनी तुडवलं

14 March 2023, 13:30 ISTAtik Sikandar Shaikh

Nashik Viral Video : दहावीचा पेपर सुटल्यानंतर पोरींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nashik City Crime News Marathi : नाशिकमधील कॉलेजकुमार तरुणांमधील हाणामारीची घटना ताजी असतानाच आता दहावीच्या विद्यार्थीनींमध्ये किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीचा पेपर सुटल्यानंतर मुलींनी झिंज्या ओढत एकमेकीना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिक शहरातील सातपूर परिसरातील एका विद्यालयाच्या गेटसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात दोन्ही गटातील विद्यार्थीनींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरातील एका महाविद्यालयात दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनींच्या दोन गटात भर रस्त्यावर अचानक हाणामारी सुरू झाली. यावेळी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याचवेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी हाणामारीचा व्हिडिओ शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळं मुलींमध्ये हाणामारी झाली, याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. परंतु या मुली एकाच शाळेतील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता या विद्यार्थीनींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कुठलीही अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

नाशिकमध्ये मुलींमध्ये हाणामारी झाल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यीनींनी टवाळखोर तरुणांना चपलेनं आणि लाकडी दांड्यानं चांगलाच चोप दिल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सातपूर परिसरातील एका विद्यालयाबाहेर मुलींमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे.