मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा; दोन आठवडे अटक करता येणार नाही

Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा; दोन आठवडे अटक करता येणार नाही

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 14, 2023 01:10 PM IST

Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Hasan Mushrif
Hasan Mushrif

Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. ईडीच्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावरील खटला रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली. याशिवाय अटकपूर्व जामिनासाठी मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात योग्य अर्ज करण्यासही न्यायालयाने सांगितले. ईडीने हसन मुश्रीफ यांना विविध गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

WhatsApp channel