मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  buldana: रुग्णांना उपचार देऊन घरी निघाले, रस्त्यात ट्रकनं उडवलं; बुलढाण्यातील डॉक्टरचा दुर्दैवी अंत

buldana: रुग्णांना उपचार देऊन घरी निघाले, रस्त्यात ट्रकनं उडवलं; बुलढाण्यातील डॉक्टरचा दुर्दैवी अंत

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 11, 2023 04:46 PM IST

Buldhana Road Accident: बुलढाण्यातील दुसरबीड येथे रस्ता अपघातात एका युवा डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

Buldana Accident
Buldana Accident

Buldana Docter Dies by Road Accident: बुलढाण्यात दुचाकी अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत पाच जणांनी दुचाकी अपघातात आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान, दुसरबीड बस स्थानकावर ट्रकच्या धडकेत एका युवा डॉक्टराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत डॉक्टर रुग्णांना उपचार देऊन दुचाकीने घरी जात होता. मात्र, घरापासून अवघ्या ३०० मीटर दूर अंतरावरच मृत्युने डॉक्टराला गाठले. डॉक्टराच्या मृत्युने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत प्रभाकर ताठे (वय, ३६) असे मृत डॉक्टराचे नाव आहे. प्रशांत हे अडगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, प्रशांत यांनी बुधवारी (९ ऑगस्ट २०२३) रुग्णांवर उपचार केला. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीने घराच्या दिशेने निघाले. परंतु, दुसरबीड बस स्थानकाजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशांत गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

प्रशांत हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे यांचे जेष्ठ पुत्र असल्याची माहिती आहे. प्रशांत यांच्या मृत्युने गावात शोककळा पसरली. प्रशांत यांच्यावर शुक्रवारी सकाळी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धावून पंचनामा केला. हा अपघात अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस शोध घेत आहेत.बस स्थानकाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना बाजूला उभे असलेल्या टेम्पोला धक्का लागून नंतर ट्रकवर धडकून हा विचित्र अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग