मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : विकृतीचा कळस! पतीचा पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, आधी अंगाला कडकडून चावे घेतले, मग...

Mumbai : विकृतीचा कळस! पतीचा पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, आधी अंगाला कडकडून चावे घेतले, मग...

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2023 11:54 AM IST

Mumbai Crime : मुंबईच्या अंधेरीमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला अनेक ठिकाणी चावा घेत मारहाण करत विकृतीचा कळस गाठला.

Mumbai Crime
Mumbai Crime (HT_PRINT)

मुंबई : मुंबईत अंधेरी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. पतीने आपल्या पत्नीला अनेक ठिकाणी चावे घेत तिला मारहाण करत अनेक ठिकाणी चावे घेतले. एवढेच नाही तर तिच्यावर अनैसर्गिक कृत्य देखील केले. पीडित पत्नीने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर आरोपी पतीविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात बदलात्कार तसेच अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंधेरीमध्ये ४२ वर्षीय तक्रारदार पीडित पत्नी ही तिच्या १७ वर्षाच्या मुलासोबत राहते. त्यांचे आरोपी पतीसोबत १८ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान, त्यांचे पटत नसल्याने त्यांनी एकमेकांविरोधात न्यायालयात धाव घेत तक्रारी दिल्या होत्या. आरोपी पती हा पीडित महिलेला मारहाण करून त्रास द्यायचा. मात्र, शनिवारी आरोपीने कळस गाठला.

 दारूच्या नशेत येत पीडितेच्या शरीवर आरोपी पतीने अनेक ठिकाणी चावा घेतला. एवढेच नाही तर तिला लाथा बुक्यांनी मारहाण देखील केली. यानंतर त्याने काचेच्या फुलदाणीला तेल लावून विकृतीचा कळस गाठत पीडित महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा त्रास सहन न झाल्याने पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठत नराधम पती विरोधात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपी पतीचा पोलिस शोध घेत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग