मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला किल्ले रायगड; शिवराज्यभिषेक सोहळ्यास जल्लोषात सुरुवात

Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला किल्ले रायगड; शिवराज्यभिषेक सोहळ्यास जल्लोषात सुरुवात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 02, 2023 06:38 AM IST

Shivrajyabhishek Din: आज दुर्गराज रायगडवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडवर जमा झाले आहेत. प्रशासनाने देखील सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

Shivrajyabhishek Din
Shivrajyabhishek Din

मुंबई: राजगडावर यंदा शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाठात साजरा केला जाणार आहे. या साठी राज्य शासनाने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी सकाळपासून शिवभक्त रायगडावर जमले असून छत्रपती शिवराय यांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ल्याचा परिसर दुमदुमला आहे. आज ८.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत. ६ जून पर्यंत हा सोहळा चालणार आहे.

SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

दरम्यान गुरुवारी रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली. या नंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यासाठी १५० बस गाड्या, ३५० आरोग्य पथके आणि तब्बल २ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Mumbai Crime : चप्पल अन् चालण्याच्या लकबीवरुन मोबाइल चोर जाळ्यात; मुंबई पोलिसांची कामगिरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उद्या तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आज राजगडावर दाखल होत आहे. या सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहनतळ उभारण्यात आला आहे. तब्बल साडेतीन हजार वाहने या ठिकाणी उभी करता येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.

आज सकाळी ७ वाजता किल्यावर ध्वजारोहन सोहळा केल्या जाणार आहे. ८.३० वाजता सोहळ्याचे उद्घाटंन होणार आहे. ९ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता श्री शिवसन्मान सोहळा तर ११ वाजता शिवपालखी सोहळा होणार आहे.

IPL_Entry_Point