मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 02, 2023 06:21 AM IST

SSC Result : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीचा निकाल कधी लागणार या बाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून आज २ जून रोजी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.

 Maharashtra ssc Result
Maharashtra ssc Result (HT)

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (दि.२) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी ११ वाजता पुण्यातील बोर्डाच्या कार्यालयात माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील काही तासात निकाल पाहता येणार आहे.

Gautam Adani Meets Sharad Pawar: पवार-मुख्यमंत्री भेटीनंतर गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

DRDO : ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याजागी मकरंद जोशी ‘डीआरडीओ’चे नवे संचालक

विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

mahresult.nic.in

 

 

 

निकाल जाहीर करण्यासंदर्भात आज बोर्डात सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग