Adani Pawar Meet : पवार-मुख्यमंत्री भेटीनंतर गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर
Gautam Adani Meets Sharad Pawar : प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अदानी यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत.
Gautam Adani Meets Sharad Pawar : हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अडचणीत सापडलेले प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन अदानी यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
सायंकाळच्या सुमारास शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही मिनिटांतच अदानी यांनी पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजेशिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरअसताना शरद पवार वर्षावर दाखलझाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झालेहोते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,शरद पवार यांनी आज घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.