मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, VIDEO

मोठी बातमी! शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 01, 2023 07:50 PM IST

sharad pawar meets cm ekanth shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

sharad pawar meets cm ekanth shinde
sharad pawar meets cm ekanth shinde

Sharad Pawarmeet cm Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरअसताना शरद पवार वर्षावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

 

शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार हे वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट नेमकी कशासाठी होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पवार आणि शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

IPL_Entry_Point