पुणे : पुण्यात दापोडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला हटकल्याने, प्रियकराने थेट रिक्षा चालकाची हत्या केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अलीम इस्माईल शेख (वय ४५) असे हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर बाळासाहेब कांबळे (वय २८), सागर माने अशी आरोपींची नावे असून दोघांनाही भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी पाच च्या सुमारास दापोडी येथे गणेश नगर भागात घडली. आरोपी अमित हा त्याच्या प्रेयसीसोबत येथे उभ्या असलेल्या एक रिक्षामध्ये अश्लील चाळे करत होता. ही बाब रिक्षा चालक इस्माईल यांना दिसल्याने, त्यांनी दोघांनाही हटकले. यामुळे अमित आणि रिक्षा चालक इस्माईल यांच्यात मोठा वाद झाला. थोड्या वेळाने अमितने त्याचा मित्र सागर माने याला बोलावले. या दोघांनी मिळून रिक्षा चालक इस्माईल याला मरण करत त्याच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथकाची स्थपणा केली. या पथकाने काही वेळातच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.