मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satara News : ठाण्यातील माजी नगरसेवक मदन कदम यांचा साताऱ्यात गोळीबार, दोन ठार, एक जखमी

Satara News : ठाण्यातील माजी नगरसेवक मदन कदम यांचा साताऱ्यात गोळीबार, दोन ठार, एक जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 20, 2023 10:00 AM IST

Satara Crime news : शिवसेनेचे ठाण्यातील माजी नगरसेवक आणि सातारा येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख मदन कदम यांनी साताऱ्यात गोळीबार केला असून त्यात दोघे ठार तर एक जन जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.

मदन कदम
मदन कदम

सातारा: सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आणि सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम यांनी काल रात्री गोळीबारात केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर एक जन जखमी झाला आहे. पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरून ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलि घटनास्थळी पोहचेले असून मदन कदम यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात घडली.

गोळीबारात मृत्यू झालेला एकजण सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम हे पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात आले होते. या ठिकाणी त्यांनी गोळीबार केला. पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरून वाद झाल्याने त्यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोघे ठार झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मदन कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

या घटनेमुळे मोरणा खोऱ्यात तानावाचे वातावरण आहे. गुरेघर धरण परिसरातील स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी तातडीने येत बंदोबस्त वाढवला आहे.

IPL_Entry_Point

विभाग