मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya sabha : आमदार सुहास कांदे यांची निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात धाव

Rajya sabha : आमदार सुहास कांदे यांची निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात धाव

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 12, 2022 09:39 PM IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केल्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे

मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांसाठी महराष्ट्रात शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत निवडणूक आयोगाने अवैध ठरवल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केल्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप कांदे यांनी याचिकेत केला आहे. सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर ती घडी न घालता तशीच ठेवली असल्याने त्यांचे मत रद्द करण्यात आले होते. मत बाद करण्यावर सुहास कांदे यांचा आक्षेप आहे.चुकीच्या पद्धतीने मत केले तसेच निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. याचा फटका महाविकास आघाडीला बसला व ३९ विरुद्ध ४१ अशा निसटत्या फरकाने धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या