मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माहीमच्या समुद्रात हिरवा झेंडा; सामनात १६ वर्षांपूर्वी आलेल्या बातमीवर राज ठाकरे आता का बोलले?

माहीमच्या समुद्रात हिरवा झेंडा; सामनात १६ वर्षांपूर्वी आलेल्या बातमीवर राज ठाकरे आता का बोलले?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 23, 2023 11:56 AM IST

Raj Thackeray: गुढीपाढवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला माहिम दर्ग्याची बातमी १६ वर्षांपूर्वी दैनिक सामनामध्ये छापून आली होती.

Raj Thackeray
Raj Thackeray

Mahim illegal Dargah: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधला जात असल्याचा व्हिडीओ दाखवला. हे बांधकाम महिन्याभरात हटवले गेले नाही तर, त्याच्या शेजारी सर्वात मोठे गणपतीचे मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, या दर्ग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी दावा केलेल्या दर्ग्याची बातमी दैनिक सामनामध्ये १६ वर्षापूर्वीच छापून आल्याचे समजत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, दैनिक सामनामध्ये १९ ऑगस्ट २००७ रोजी 'माहिमच्या समुद्रावर हिरवा झेंडा' अशी बातमी छापून आली होती. या बातमीत वक्फ बोर्डाने अवघ्या दोन दिवसांत हजरत ख्वाजा खिज्र हयातून नबी चिल्ला ट्रस्टला माहीमच्या खाडीत भराव करण्यास परवागनी दिली. त्यानंतरच या समुद्रात भराव टाकून बांधकाम उभारण्यात आले, असेही या बातमीत म्हटले होते. दरम्यान, समुद्रात हिरवा झेंडा फडकवल्याचा फोटोही दैनिक सामन्यामध्ये छापण्यात आला होता.

राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाढवा मेळाव्यात माहीमच्या दर्ग्याच्या बाजूलाच अनधिकृत दर्गा बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. या ठिकाणी कबर बांधण्यात आली आहे. माहीम पोलीस ठाणे बाजूलाच आहे. मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्यासमोर बांधकाम होत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. तसेच हे बांधकाम महिन्याभरात पाडले गेले नाही तर, आम्ही त्याच्या बाजूला गणपतीचे मंदिर उभारू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील अनधिकृत दर्ग्यावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम महिन्याभरात हटवले गेले नाही तर, त्याच्या बाजूला गणपतीचे मंदीर बांधू असाही इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर २४ तासाच्या आत महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग