मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी करून ३२ कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न

Pune Crime : बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी करून ३२ कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2023 05:23 PM IST

पुण्यातील वडगाव शेरी येथील सर्वे नंबर ३२ या ठिकाणची बाजार भाव ३२ कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी येथील सर्वे नंबर ३२ या ठिकाणची बाजार भाव ३२ कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी करून, तिचा वापर करत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अनिल दत्तात्रय भालेकर (वय ४४, रा.ज्योतिबा नगर, पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मनीष धरमपाल दाहिया (वय ३९, रा. दिल्ली) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ११/२/२०२२ ते आजपर्यंत घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनीष दहिया हे भारत हॉटेल कंपनी, नवी दिल्ली या कंपनीत सिक्युरिटी मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या मालकीची वडगाव शेरी येथे सर्वे नंबर ३२ या ठिकाणी मालमत्तेची फसवणूक करून विक्री करण्याकरीता, आरोपी अनिल भालेकर यांनी कंपनीचे सेक्रेटरी मृत विजयकुमार वर्मा व अरविंद सचदेव हे मयत असताना त्यांचे नाव वापरून, ११/२/२०२२ रोजीचे कंपनीच्या नावाचे बनावट लेटरहेडवर माहिती, शिक्का व सही बनावट केली. बोर्ड ऑफ रेसुलेशन बनवून त्याचा वापर करून मृत विनयकुमार वर्मा हे मयत असताना, त्यांच्या जागेवर बनावट व्यक्ती उभा करून बनावट आधार कार्ड, कंपनीचे बनावट पॅन कार्ड बनवून त्याचा वापर करून बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी आरोपीने स्वतःच्या नावावर करून घेतली.

त्यानंतर प्रॉपर्टीची विक्री करण्याच्या उद्देशाने व कंपनीची अंदाजे ३२ कोटी रुपयांची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी तयार केली आहे. तिचा वापर करून सदर मालमत्तेची विक्री करण्याचा प्रयत्न आरोपी करत असल्याने सदर आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आळेकर याबाबत पुढील तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग