मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune sex racket : पुण्यात मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ६ तरुणी ताब्यात

Pune sex racket : पुण्यात मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ६ तरुणी ताब्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2023 11:20 AM IST

Pune sex racket : पुण्यात मसाजपार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Sex Racket In Pimpri Chinchwad
Sex Racket In Pimpri Chinchwad (HT)

पुणे : पुण्यात विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. या पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी सहा तरुणींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! बंगाल, ओडिशाला हवामान विभागाचा हायअलर्ट

या प्रकरणी पोलीस नाईक इम्रान नदाफ यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मसाज सेंटर व्यवस्थापक मणीकंठ राहुल नायडू (वय २०, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड), विशाल अग्रवाल, नायडू बाई, नितिन माने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर भागात अमायरा स्पा नावाच्या मसाज पार्लर आहे. या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवण्यात आला.

Gautami Patil : गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

सर्व व्यवहार ठरल्यावर पोलिसांनी खातर जमा करून बनावट ग्राहकाचा इशारा मिळताच मसाज पार्लरवर छापा घातला. यावेळी सहा तरुणीद्वारे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी या तरुणींना ताब्यात घेतले. तसेच मसाज सेंटरमधून रोकड तसेच मोबाइल संच असा १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, बाबा कर्पे, अजय राणे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.

 

IPL_Entry_Point

विभाग