मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! बंगाल, ओडिशाला हवामान विभागाचा हायअलर्ट

Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! बंगाल, ओडिशाला हवामान विभागाचा हायअलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2023 10:40 AM IST

Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने मोचा चक्रीवादळ तयार होणार आहे. ५ ते ७ तारखे दरम्यान हे वादळ तयार होऊन ते बांग्लादेश आणि बंगाल आणि ओडीशा किनारपट्टीला धडकणार आहे.

Cyclone Mocha
Cyclone Mocha

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने मोचा चक्रीवादळ तयार होणार आहे. ५ ते ७ तारखे दरम्यान हे वादळ तयार होऊन ते बांग्लादेश आणि बंगाल आणि ओडीशा किनारपट्टीला धडकणार आहे. यामुळे या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे येत्या दोन दिवसात वायव्य भारतात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दरम्यान, हे वादळ हवेतील आद्रता शोषून घेणार असल्याने राज्याच्या कमाल तापमानात हळू हळू वाढ होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar : मुंबई कुणीही तोडणार वगैरे नाही; शरद पवारांनी काढली शिवसेनेच्या प्रचारातील हवा

देशात अनेक राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यात आता बंगालच्या उपसगारात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मोचा नामक चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे वादळ हवेतील आद्रता शोषून घेणार असल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अवकळी पावसाचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले आहे.

Maharashtra Politics : पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; किरण रिजिजू यांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. हे ५ ते ७ तारखेला हे चक्रीवादळ तयार होऊन ते भारताच्या बंगाल आणि ओडीशा या राज्यांना ११ ते १५ मे दरम्यान धडकणार आहे. या सोबतच बांग्लादेशला देखील हे वादळ धडकणार आहे. दरम्यान, आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा देखील अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

Dhamtari Accident : लग्न लावून परतणाऱ्या जीपला अपघात, १० जण जागीच ठार

हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे समुद्रात न उतरण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्याला येत्या ७२ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस वातावरण ढगाळ राहून अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४ ते ७ मे पर्यंत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वेगळ्या भागात हलक्या ते हलक्या पाऊस होण्याची शक्यता आहे. ५ मे पासून हे प्रमाण कमी होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, हळूहळू दक्षिणी द्वीपकल्पातील आर्द्रता अगदी महाराष्ट्र राज्यातूनही हे वादळ ओढून घेणार असून त्यामुळे ६ ते ७ मे पासून आपल्या राज्यातील कमाल तापमान हळूहळू वाढेल असा अंदाज पुणे हवामान विभागाने दिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग