मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Sex Racket: पुण्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीला पाहून पोलीसही चक्रावले

Pune Sex Racket: पुण्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीला पाहून पोलीसही चक्रावले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 14, 2023 12:44 PM IST

Sex racket busted in Pune: पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

Sex Racket In Pimpri Chinchwad
Sex Racket In Pimpri Chinchwad (HT)

पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि भोजपुरी चित्रपट अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीच अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यादरम्यान, पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेलची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपींनी पीडितांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत केले. ग्राहकांनी अधिक पैसे दिले होते, अशी माहिती वाकड पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी देवेन चव्हाण यांनी दिली.

प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी महिलांना मोठ्या रक्कमेचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायात अडकवले होते. या सेक्स रॅकेटचे धागेदोर कुठपर्यंत आहेत? ग्लॅमर इंडस्ट्रीतील इतर महिलांचाही यात सहभाग आहे का? यासंदर्भात पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग