मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा; मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही; अजित पवारांनी ठणकावले

Ajit Pawar : नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा; मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही; अजित पवारांनी ठणकावले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2023 12:34 PM IST

Ajit Pawar News : अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंब्याचे पत्र आहे, अशी बातमी न्यू इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. यामुळे राजकीय भूकंप राज्यात आला आहे. मात्र, ही फक्त चर्चा आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar In Pune
Ajit Pawar In Pune (HT_PRINT)

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेत मोठी फुट पडल्यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. याचे पत्र अजित पवार यांच्याकडे आहे, असे वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. मात्र, नव्या राजकीय समिकरणाची नुसती चर्चा आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही असे देखील अजित पवार म्हणाले.

Supriya Sule : आता बोला! सुप्रिया सुळे स्वत:च म्हणाल्या, दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामुळे आज राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचं एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. दरम्यान या चर्चा सुरू असतांना आज अजित पावर विधान भवनात दाखल झाले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार त्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, असंही बनसोडे यांनी सांगितलं.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवारांच्या हातून जाणार? अजित पवारांकडे ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र

मात्र, या सर्व चर्चा अजित पवार यांनी फेटाळल्या आहेत. अजित पवार यांनी एका वृत्त वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले की नव्या राजकीय समिकरणाची केवळ चर्चा सुरू आहे. माध्यमांनी उडवलेल्या या वावड्या आहेत. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, असे देखील अजित पवार या वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले.

 

IPL_Entry_Point

विभाग