मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवारांच्या हातून जाणार? अजित पवारांकडे ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवारांच्या हातून जाणार? अजित पवारांकडे ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2023 11:16 AM IST

Ajit Pawar in mood of revolt : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठी फुट होण्याची शक्यता आहे. न्यू इंडिया एक्सप्रेसने याचे वृत्त दिले आहे.

Chandrasekhar Bawankule On Ajit Pawar
Chandrasekhar Bawankule On Ajit Pawar (HT_PRINT)

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेत मोठी फुट पडल्यावर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. याचे पत्र अजित पवार यांच्याकडे आहे, असे वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडली आहे. सध्या अजित पावर हे मुंबईतील देवगिरी बंगल्यावर असून ते ११ वाजता विधान भवनात जाणार आहे. या ठिकाणी ते काही नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते.

ट्रेंडिंग न्यूज

Pune NIA Action : पुण्यातील ब्यू बेल शाळेत दहशतवादाचे प्रशिक्षण, NIAने शाळेचे दोन मजले केले सील

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. काल त्यांनी सासवड येथील कार्यक्रम रद्द करून अचानक ते मुंबईला देवगिरी बंगल्यावर गेले होते. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे आजारी पडलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ते सासवड येथे जाणार होते. मात्र, त्यांनी तो कार्यक्रम रद्द करत मुंबईतच राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला होता. दरम्यान, शरद पवार यांनी देखील ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे असे वक्तव्य केले होते. दरम्यान, आज इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Weather : राज्यात तापमानाचा पारा वाढणार; अवकाळी पावसाचे संकटही कायम

न्यू इंडियन एक्सप्रेस नुसार अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असून काही आमदार आज अजित पवार यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. गरज भासल्यास हे पत्र राज्यपालांना देण्याची तयारी अजित पवार यांची आहे. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर अजित पवार हे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, या संदर्भात मौन बाळगले आहे. अजित पवार हे गेल्या आठवड्यात दोन वेळा नॉट रीचेबल राहिले होते. २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला होता त्यावेळी शरद पवार यांनी सगळ्या आमदारांना परत बोलवत अजित पवार यांचं बंड मोडून काढले होते. मात्र, या वेळेला जर बंड झाले तर हे बंड शरद पवार हे रोखू शकतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point