मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule : आता बोला! सुप्रिया सुळे स्वत:च म्हणाल्या, दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

Supriya Sule : आता बोला! सुप्रिया सुळे स्वत:च म्हणाल्या, दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 18, 2023 11:11 AM IST

Supriya Sule reaction on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील संभाव्य राजकारणाबाबत मोठं विधान केलं आहे.

Supriya Sule - Ajit Pawar
Supriya Sule - Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह फुटून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राजकीय नेत्यांना जिथं-तिथं हेच प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवार यांनी काल या चर्चा फेटाळल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

त्या पत्रकारांशी बोलत होत्या. येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असं त्या म्हणाल्या. त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असं त्या म्हणाल्या.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र

अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेबद्दल पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारलं. त्यावर, सर्व चॅनेलवाल्यांनी एक युनिट अजितदादांच्या मागे लावायला हवं, असं सुळे म्हणाल्या. 'राज्यात अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. राज्यातील सत्ताधारी चुकीच्या पद्धतीनं काम करत आहेत. एक कार्यक्रम रद्द झाल्यामुळं काही होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर, 'हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारा. माझ्याकडं गॉसिप करण्यासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडं खूप काम आहे. त्यामुळं या गोष्टींबद्दल मला फारशी माहिती नाही. अजितदादा हे काम करणारे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल अशी विधानं केली जातात, अशी पुस्तीही सुप्रिया सुळे यांनी जोडली.

IPL_Entry_Point

विभाग