मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Temples Dress Code : राज्यातील चार मंदिरांमध्ये नवा ड्रेसकोड लागू, भक्तांना दर्शनासाठी नवे नियम जारी

Temples Dress Code : राज्यातील चार मंदिरांमध्ये नवा ड्रेसकोड लागू, भक्तांना दर्शनासाठी नवे नियम जारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 27, 2023 09:47 AM IST

new dress code in temples : तुळजाभवानी मंदिरातील नव्या नियमांवरून वाद सुरू असतानाच आता राज्यातील चार मंदिरांमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहे.

new dress code in nagpur temples
new dress code in nagpur temples (HT)

new dress code in nagpur temples : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ऐतिहासिक मंदिरांमध्ये वादाच्या घटना समोर येत आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी नवा ड्रेसकोड लागू केल्याने वाद पेटला आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील तब्बल चार मंदिरांमध्ये भक्तांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने भक्तांसाठी वस्त्रसंहिता जारी केली आहे. त्यानुसार कोणत्याही भक्तांना तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र मंदिर महासंघाने नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागपुरसह राज्यातील अन्य ३०० हून अधिक मंदिरांमध्ये हे नियम लागू केले जाणार असल्याचंही महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता नागपुरातील चार मंदिरांमध्ये भक्तांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळं आता कमी कपडे अथवा तोकडे कपडे घालून येणाऱ्या भक्तांना नागपुरातील मंदिरांत प्रवेश करता येणार नाही. त्यासाठीचे अनेक फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भक्तांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. अनेकदा भक्त आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांमध्ये ड्रेसकोडच्या कारणावरून वाद होत आहे. त्यामुळं आता अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता भक्तांनी मंदिरात प्रवेश करताना कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत, यासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आल्यामुळं यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग