मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : वीकेंडच्या दिवशीच मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

Mumbai Local Mega Block : वीकेंडच्या दिवशीच मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 27, 2023 09:22 AM IST

Mumbai Local Train Block : उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मुंबईत मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं आता ऐन वीकेंडलाच प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Central Railway Megablock In Mumbai
Central Railway Megablock In Mumbai (HT)

Central Railway Megablock In Mumbai : वीकेंडला फिरण्यासाठी आणि अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्याविहार स्थानकावरील उड्डाणपूल आणि गर्डरच्या कामासाठी मुंबईत मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेने शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. याशिवाय अनेक लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. मेगाब्लॉकवेळी कुर्ला आणि भांडूप दरम्यानची वाहतूक संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळं आता सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी मुंबईबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

मुंबई महापालिकेकडून विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचं हाती घेण्यात आलं आहे. तसेच विद्याविहार स्थानकावर पहिला गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळं कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेत अनेक लोकल सेवा रद्द केल्या आहे. त्याचा परिणाम कुर्ला ते भांडूप लोकल सेवेवर होणार आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवरही मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. त्याचा मुंबईबाहेरील प्रवाशांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

कोणत्या लोकल सेवा रद्द होणार?

मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्यानंतर कुर्ला ते भांडूप या मार्गासह सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते सीएसएमटी, कर्जत ते सीएसएमटी, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. याशिवाय शालीमार-एलटीटी, हावडा-सीएसएमटी दादर, विशाखापट्टणम, गोरखपूर, हैदराबाद आणि गदग एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटं उशिराने धावणार आहेत.

WhatsApp channel