नवी मुंबईतील नेरूळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. येथे १६ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने फूस लावून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता नवी मुंबईतील नेरुळमध्ये राहते. या १६ वर्षीय शाळकरी मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. या मुलाला फूस लावून तरुणाने तिच्यावर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उजेडात आला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा करून त्याला अटक केली आहे.
पुण्यातील शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात दुपारी घडली. एक तरुणी बोलत नसल्याच्या कारणामुळे दोघांनी तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने प्रसंगावधान राखत, आरडा ओरडा केल्याने हल्लेखोर दोघे पळून गेले. दोघेही दुचाकीवरून फरार झाले.
खडक पोलिसांनी एका आरोपी तरुणाला सोमवारी रात्री अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तरुणी बोलत नसल्याच्या रागातून त्याने हा हल्ला केल्याचे संगितले.