नवी मुंबईत एक खाडी पूल कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. उरण तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे. धुतुम ते दिघोडा दरम्यानचा खाडी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उरण तालुक्यात धुतुम ते दिघोडा खाडी पूल सायंकाळच्या सुमारास कोसळला. उरण पोलीस स्टेशन हद्दीतील दादरपाडा या गावतील गाव ते शेतीला जोडणारा पूल होता.
पूल कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली चार लोक अडकली होती. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आहे.