मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi: मोदी उद्या मुंबईत, पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा भिंत पाडली!

PM Modi: मोदी उद्या मुंबईत, पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा भिंत पाडली!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 18, 2023 12:19 PM IST

मुंबईत उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची सुरक्षा भिंत पाडण्यात आली आहे.

PM Narenra Modi Mumbai Tour
PM Narenra Modi Mumbai Tour

PM Naredra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबईत येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर मोदींची जाहीर सभेसाठी मुंबई विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा भिंत तात्पुरती पाडण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी मुंबई विद्यापीठाची भिंत पाडल्याने राजकीय विरोधक भाजपवर टीका करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मुंबई विद्यापीठच्या आवारातील सुरक्षा भिंत पाडण्यात आली. या सभेसाठी येणाऱ्या नागिरकांच्या वाहनांची व्यवस्था विद्यापीठात केली जाणार आहे. सभेनंतर मुंबई विद्यापीठाची सुरक्षा भिंत पुन्हा बांधून दिली जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एमएमआरडीए मैदानावर काल पार पडली. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे संजय उपाध्याय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिन जोशी, प्रवक्त्या शितल म्हात्रे, सुशांत शेलार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या पहिल्याच पानावर नरेंद्र मोदींची भली मोठी जाहीरात छापण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाने मोदींच्या कार्यक्रमाची जाहिरात स्वीकारली तरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग