मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या आमिषाने बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला अटक

Mumbai Crime : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या आमिषाने बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 13, 2022 12:58 PM IST

Mumbai Crime : मुंबईत महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या आमिषाने एका महिलेवर मनसेच्या पदाधीकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पदाधीकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याने केला बलात्कार
मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याने केला बलात्कार (HT_PRINT)

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या बलात्कारी मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

येत्या काही दिवसांत महानगर पालिकेच्या निवडणूका होणार आहे. मुंबई महानगर पालिका जिंकन्यासाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. त्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. अशाच एका नगरसेवक होण्याची मनीषा बाळगणाऱ्या महिलेला मनसेच्या पदाधिकाऱ्याने या माहीलेला नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्याचे आमिष दाखवले. या साठी त्याने या महिलेवर बलात्कार केला. या नंतर ४२ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत या पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे.

आरोपी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागप्रमुख आहे. त्याने पीडित महिलेला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेवर बलात्कार केला. हा प्रकार सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान घडला. महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचागुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग