मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro : मेट्रो संदर्भातील तक्रार नोंदवा आता whatsapp वर; महाराष्ट्र दिनापासून MMOPL कडून नवीन सेवेस

Mumbai Metro : मेट्रो संदर्भातील तक्रार नोंदवा आता whatsapp वर; महाराष्ट्र दिनापासून MMOPL कडून नवीन सेवेस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 02, 2023 12:42 AM IST

Mumbai Metro : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवायामेट्रो टप्पा १ मधील प्रवाशांना आता आपल्या मेट्रो १ सेवेबाबतच्या कोणतीही तक्रारwhatsapp वररजिस्टर करता येणार आहे.

Mumbai Metro
Mumbai Metro

मुंबई मेट्रोने महाराष्ट्र दिनापासून प्रवाशांसाठी नवीन सेवेची सुरुवात केली आहे.घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो टप्पा १ मधील प्रवाशांना आता आपल्या मेट्रो १ सेवेबाबतच्या कोणतीही तक्रार whatsapp वर रजिस्टर करता येणार आहे. ९९३०३१०९०० या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर प्रवाशांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रवाशांनी आपली तक्रार नोंदवल्यानंतर मुंबईमेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) ७२ तासांच्या आत निवारण केले जाणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एमएमओपीएलकडून या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

मेट्रो प्रवाशांच्या सुविधेसाठी एमएमओपीएलकडून नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्थानकांवर ग्राहक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोशल मीडिया आणि ई मेलच्या माध्यमातून प्रवाशांचे प्रश्न, समस्या आणि तक्रारी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न एमएमओपीएलकडून केला जात आहे.

 

आता यापुढे सोमवारपासून एमएमओपीएलने व्हॉट्सअ‍ॅपवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग