मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा पाऊण तास ठप्प, कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा पाऊण तास ठप्प, कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 26, 2023 09:23 PM IST

Mumbai metro news :मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरची वाहतूककाही वेळठप्प झाली होती.दुरुस्तीनंतर आता मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. मेट्रो प्रशासनाकडून ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे.

Mumbai metro
Mumbai metro

Mumbaimetro News : मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रोची सेवा विस्कळीत झाल्याचे समोर आले होते. मात्र दुरुस्तीनंतर आता मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. मेट्रो प्रशासनाकडून ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सायंकाळच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळीतांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. मेट्रो प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पाऊण तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण होत मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. तसंच मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत असे सांगितले की, 'रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. वेळापत्रकानुसार मेट्रो सेवा नियमित करण्यात येत आहेत. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. 'मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मेट्रो सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर मेट्रो उशिराने धावत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मेट्रोची सेवा ठप्प झाल्यानंतर प्रशासनानेच ट्विट करत माहिती दिली होती. या ट्वीटमध्ये मेट्रो प्रशासनाने असे सांगितले होते की, 'तांत्रिक बिघाडामुळे सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहे. 'दरम्यान, पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग