मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navratri 2023 : नवरात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत खेळा गरबा, मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या

Navratri 2023 : नवरात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत खेळा गरबा, मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 13, 2023 10:38 PM IST

Mumbai metro in Navratri festival : नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग२अ आणि७या मेट्रो मार्गांवरमेट्रोच्याअतिरिक्तफेऱ्यासुरू करण्यात आल्या आहेत.

Mumbai metro
Mumbai metro

शारदीय नवरात्र उत्सव रविवारपासून सुरू होत आहे. नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग२अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. या काळात त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमएमआरडीएने घेतलेल्या निर्णयानुसार २९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रोरात्री १२.२० वाजता सोडण्यात येणार आहे.

याकालावधीत १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्तफेऱ्या असणार आहेत. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५.५५ ते रात्री १०.३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी २३८ आणि  रविवार २०५ इतक्या सेवा याआठते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.

१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नियमित सेवांनंतर १५ मिनिटांच्या अंतराने १४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि  मेट्रो मार्ग ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री १.३० वाजता पोहोचेल.

IPL_Entry_Point

विभाग