मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार मेट्रो ३ ची भेट! मेट्रो १२ ने कल्याण डोंबिवलीकरांचाही प्रवास होणार वेगवान

Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना मिळणार मेट्रो ३ ची भेट! मेट्रो १२ ने कल्याण डोंबिवलीकरांचाही प्रवास होणार वेगवान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 24, 2023 05:15 PM IST

Mumbai Metro 3 and 12 : नव्या वर्षात मुंबईकरांना मेट्रो ३ ची भेट मिळणार असून कल्याण डोंबिवलीकरांसाठी सुविधाजनक मेट्रो १२ ची निविदाही दोन दिवसात निघणार आहे.

Mumbai Metro (file Pic)
Mumbai Metro (file Pic)

मुंबईकरांनायेत्यावर्षात म्हणजे २०२४ मध्ये मुंबई ३ ची विशेष भेट मिळणार आहे.मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३(Metro 3)च्या फेज१चं उद्घाटनपुढील वर्षीसुरुवातीलाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मेट्रो३च्या एकूण३७स्थानकांपैकी फेज१मधील अंधेरी - एमआयडीसी मेट्रोस्थानकाचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. त्यामुळे नव्या वर्षातमुंबईकरांना नव्या मेट्रोनं प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबरकल्याण आणि डोंबिवलीतील नागिरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.त्यांनामुंबई आणि नवी मुंबई काही मिनिटातच गाठता येणार आहे. मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मेट्रो ३ पुढील वर्षा धावणार -

कुलाबा ते वांद्रे या मेट्रोच्या मार्गिकेचं भूमिगत काम सुरु आहे. त्यातच आता या मार्गिकेचं काम१०० टक्केपूर्णझाले आहे. यामुळेमुंबईकरांचा प्रवास सुखकरआणि वेगवान होणार आहे.त्यामुळेया मार्गावरून प्रवास करण्याचीमुंबईकरांची प्रतीक्षा येत्या२०२४मध्येसंपण्याची चिन्हे आहेत.

कुलाबा ते वांद्रे सिप्झ या मेट्रो ३ मार्ग सुरू झाल्यानंतर साडेचार लाख वाहन फेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. यामुळे अडीच लाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. तसेच २०३१ पर्यंत वाहन फेऱ्या कमी होण्याची संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दरवर्षी १० हजार मेट्रीक टन कर्बवायुंचं प्रमाण कमी होईल. अडीच लाख टन प्रदुषित वायू प्रति वर्षी कमी होण्यास मदत होईल.

कल्याण-डोंबिवलीकरांना गुडन्यूज -

मेट्रो १२ सुरू झाल्यास कल्याण डोंबिवलीकरांना मुंबई आणि नवी मुंबई काही मिनिटातच गाठता येणार आहे. याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणारआहे. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडने जोडण्यासाठीची संकल्पना आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत मांडली.

त्यावर एमएमआरडीए प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निविदे नंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग