मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईतील कामाठीपुरामध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai Fire: मुंबईतील कामाठीपुरामध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 12, 2024 12:08 AM IST

Mumbai Kamathipura Fire : मुंबईतील कामाठीपुरा भागात भीषण अग्नितांडव सुरु असून तीन मजली इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईतील कामाठीपुरामध्ये भीषण आग
मुंबईतील कामाठीपुरामध्ये भीषण आग

मुंबईतील कामाठीपुरामध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. आग कामाठीपुरातील १३ व्या नंबरच्या गल्लीत लागली आहे. आग तळमजल्यासह तीन मजली इमारतीला लागली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला व आग आणखी भडकली. अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अजून समोर आलेले नाही. फायर ब्रिगेडच्या ५ गाड्या कामाठीपुऱ्यातील गल्ली नंबर १३ मध्ये दाखल झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही.

कामाठी पुराच्या १३ व्या गल्लीजवळ असलेल्या पोलीस बीट चौकीसमोरील इमारतीला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ लोकांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले आहे. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कामठी परिसरातील पठारे इमारतीच्या तिसऱ्या फ्लोअरला आग लागली. ही इमारत अथरे बिल्डिंग / अली अकबर चाळ, सुलतान हॉटेलच्या शेजारी आणि महाराष्ट्र कोलाज कामाठीपुरा गल्ली क्रमांक १४ मध्ये आहे.

IPL_Entry_Point

विभाग