Mumbai Coastal Road Traffic Advisory: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मार्च २०२४) दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी केली होती.
मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाले असून त्याचा अंदाजित खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे. धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोडलगत ३२० एकरात जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात साडेदहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. वरळी सीफेस, हाजी अली इंटरचेंज आणि अमर्सन इंटरचेंज पॉईंटवरून वाहनचालक कोस्टल रोडवर प्रवेश करू शकतात आणि मरीन लाइन्स येथे बाहेर पडू शकतात.
जलद वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला मुंबई कोस्टल रोड हा खान अब्दुल गफ्फार खान रोड आणि बिंदू माधव ठाकरे जंक्शन ते मरीन ड्राइव्ह दक्षिण बाउंड येथे वाहतुकीसाठी अंशत: खुला करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत वाहनांना परवानगी असेल. या मार्गावर वाहने थांबवून वाहनांमधून बाहेर पडण्यास तसेच फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
बेस्ट व एसटी बस वगळून सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहने, वाहने वाहून नेणारे प्रवासी आणि सर्व मालवाहू वाहनांना परवानगी नाही. याशिवाय, सर्व प्रकारची दुचाकी, सायकल व अपंग व्यक्तींच्या मोटारसायकल व स्कूटर, सर्व प्रकारची तीनचाकी, जनावरे ओढलेल्या गाड्या, टांगा व हातगाड्यांना परवानगी नसेल.
संबंधित बातम्या