मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कल्याण ते कसारा प्रवास आता होणार सोपा, सुकर अन् वेगवान! मध्य रेल्वेने दिली खूशखबर

कल्याण ते कसारा प्रवास आता होणार सोपा, सुकर अन् वेगवान! मध्य रेल्वेने दिली खूशखबर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 13, 2023 04:31 PM IST

Mumbai local train : कल्याण कसारा मार्गावर तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असून ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यास या मार्गावरील लोकल वाहतून वेगवान होणार आहे.

Mumbai local train
Mumbai local train

कल्याणच्या पुढे प्रवास करणाऱ्या मुंबईकर व चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने खुशखबर दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या वाहतूक खोळांब्यावर उपाय म्हणूनकल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेनेसुरू केले असून आता याप्रकल्पाचे५०टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील लोकल सेवा जलदगतीने होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कल्याण कसारा तिसऱ्या लेनसाठी ७३टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून इतर कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईच्या बाहेर कसारा परिसरातमोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. या उपनगरांतून मुंबईला कामासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कल्याण-डोंबिवली, टिटवाळापासून ते विरार-वसईपासून चाकरमान्यांची मुंबईत नोकरीसाठी दररोज ये-जा असते.

मध्ये रेल्वेवर कल्याणच्या पुढेदुहेरी रेल्वे मार्ग असल्याने या मार्गावर एक्स्प्रेस, लोकल आणि मालगाडी असल्याने लोकल प्रवासास अडचणी निर्माण होतात.त्याचबरोबर मालगाडीचे इंजिन बंद पडण्याचे प्रकारही अनेकदा होत असतात. याचा परिणाम लोकल सेवेवर होत असतो. त्यामुळे कल्याणच्यापुढे लोकलचा वेग मंदावत जातो.

या मार्गावरी तिसऱ्या व चौथ्या लेनची मागणी होत होती. कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका बनवण्यासाठी२०११मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार २०२०मध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादनासाठी अडचणी येत असल्याने हा मार्ग रखडला होता. मात्र,आता७५टक्के भूसंपादन झाले आहे. कल्याण ते कसारादरम्यान तिसरी लेन टाकण्यासाठी जवळपास ४९.२३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून ३५.९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या मार्गिकेवरील आठ प्रमुख पुलांपैकी पाच पुलांचे काम सुरू आहे. दोन रोड ओव्हरब्रिजसह अन्य कामे सुरू आहेत.

 

कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ७९२.८९ कोटींचा खर्च अपेक्षित असून याची एकूण लांबी ६७.३५ किमी आहे. तिसरी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर कल्याण, कसारा मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधील गर्दी कमी होईल. तसंच, यामुळं प्रवास देखील वेगवान होईल.

IPL_Entry_Point