मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; वाचा सविस्तर वेळापत्रक

Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; वाचा सविस्तर वेळापत्रक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 01, 2023 06:32 PM IST

Mumbai Mega Block : उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. याकामासाठी कल्याण ते अंबरनाथ मार्गावर मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Mega Block
Mumbai Mega Block

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य मार्गावर शनिवारी व रविवारी दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाला दोन दिवस लागणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवार-रविवारी मध्यरात्री १.२० वाजल्यापासून ते ३.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याच्या कामासाठी लोकल सेवेत बदल करण्यात येणार आहे. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्यासाठी हा मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. 

मेगाब्लॉकचे वेळापत्रक -

 

  • शनिवारी व रविवारी दोन दिवस सीएसएमटीहून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी तसेच अंबरनाथहून सीएसएमटी येथून अंबरनाथकडे रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. 
  • सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ल्यापर्यंत धावणार आहे.
  • सीएसएमटी येथून रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर कर्जतहून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ही ठाण्याहून सुटेल. ही लोकल ट्रेन पहाटे ४.०४ वाजता सीएमसीएसटी स्थानकात दाखल होईल.
  • मेगाब्लॉक सुरू होण्याआधी सीएसएमटी येथून कर्जतसाठी सुटणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. 
  • ब्लॉकआधी खोपोली येथून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल १०.१५ वाजता सुटेल.
  • सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतसाठी पहिली लोकल पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पहाटे ०३.४० वाजता सुटेल. 
  • ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन सेवा रद्द राहतील.

IPL_Entry_Point