मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Mega Block : मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2024 09:41 AM IST

Mumbai Local Mega Block : आज मध्य रेल्वेने विविध मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आला आहे. यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ११ ते ४ या काळात हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block Today : मुंबईकरांचा आज सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जाण्याची तयारी करत असाल तर ही बातमी वाचा. मुंबईत आज देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विशेष करून ११ ते ४ या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने रेल्वेचे वेळापत्रक तपासून घराबाहेर पडण्याची नियोजन नागरिकांना करावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

असा असेल मेगा ब्लॉक; काही लोकल रद्द तर काही धावणार धीम्या गतीने

मध्य रेल्वे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या या धिम्या मार्गावरील माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबवल्या जाणार आहेत. तर डाऊन जलद मार्गावर काही गाड्या वळवण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल १५ मिनिटे उशीरा या मार्गावरील गाड्या धावणार आहेत. तर ठण्यातून सकाळी ११ ते दुपारी ४ च्या दरम्यान सोडण्यात येणाऱ्या लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असून या गाड्या पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबवल्या जाणार असून त्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या देखील १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११ ते ५ दरम्यान, सुटणाऱ्या आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व अप व डाउन लोकल या देखील १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.

तर डाउन धीम्या लाइनवर ब्लॉकच्या आधी शेवटची लोकल ही टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५३ मिनिटांनी सुटणार आहे. तर ब्लॉकनंतर पहिली लोकल ही आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३३ वाजता सोडण्यात येणार आहे. अप धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही ठण्यातून सकाळी १०.२७ ला सोडण्यात येणार आहे. तर ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ही ठण्यातून दुपारी ४.३ ला सोडण्यात येणार आहे.

ट्रान्स हार्बर : या मार्गावर देखील सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात वाशी/नेरुळ स्थानकांमध्ये अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग, वाशी/नेरुळ व ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर वाशी-नेरूळ-पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.७ दरम्यान, ठाणे येथून सुटणाऱ्या गाड्या सकाळी १०.२५ ते दुपारी ४.९ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल ठाणे येथून सकाळी १०.३५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर वाशी लोकल ही ठण्यातून दुपारी ४.१९ वाजता सुटणार आहे.

पश्चिम रेल्वे : या मार्गावरील माहीम - अंधेरी अप व डाउन हार्बर लाईनवर ११ ते ४ दरम्यान, मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक ५ तासांचा राहणार आहे. या काळात सर्व सीएसएमटी - वांद्रे - सीएसएमटी आणि सीएसएमटी - गोरेगाव - सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा व चर्चगेट -गोरेगाव दरम्यानच्या काही धीम्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत .

IPL_Entry_Point