मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई हादरली.. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर मरीन ड्राईव्ह परिसरात बलात्कार

मुंबई हादरली.. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर मरीन ड्राईव्ह परिसरात बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2023 11:16 PM IST

Mumbai crime : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी अन्य राज्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

मायानगरी मुंबईअन्य शहरांच्या तुलनेत महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याचं म्हटलं जातं मात्र आज समोर आलेल्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी अन्य राज्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पीडित तरुणी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत आली होती. या १९ वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केला आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तो तिचा मित्र होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या ओळखीचा असून दोघेही बुधवारी हरियाणातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी एकत्रच मुंबईत आले होते. शूटिंग संपल्यानंतर १९ वर्षीय तरुणी आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्रीच्या वेळी कोणीतरी तिच्या रुमची बेल वाजवली. तिने दरवाजा उघडला असता आरोपीने जबरदस्तीने तिच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केली. पीडितेने विरोध केला असता, त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने म्हटले आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

IPL_Entry_Point

विभाग