Weather Updates: मुंबईत उष्णता कायम (Mumbai Temperature Today) असून तापमान ३४ सेल्सिअसवर पोहचले आहे. भारतीय हवामान खात्याने ( India Meteorological Department) कोकण आणि मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागिरकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आज विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada Rain) पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने माहिती दिली.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात उकाडा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात येत्या २५ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम असेल. त्यानंतर अरबी समुद्रातून येणारे दमट उष्ण वारे किनाऱ्याकडे वाहतील ज्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकेल, असे सांगण्यात आले.
हवामान विभाग काही भागात अपेक्षा करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना उष्णतेपासून तात्पपुरता दिलासा मिळू शकतो. सोलापूर, अक्कलकोट, पुणे, लातूर, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे अपेक्षित पाऊस झाला.
विदर्भात रविवारी तापमान हे ४० अंश सेल्सिअसवर होते. राज्यात वाशिममध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला रविवारी तापमानात थोडी घट झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
वाशिम (४३.२), पुणे (३८), अहमदनगर (३९.८), जळगाव (४१.४), कोल्हापूर (३४), महाबळेश्वर (३१.१), मालेगाव (४१.६), नाशिक (३७.७), सांगली (३३.१), सोलापूर (३९.६), छत्रपती संभाजीनगर (४०.२), परभणी (४२.२), बीड (४०.७), अकोला (४३), अमरावती (४१), चंद्रपूर (४१.८), गोंदिया (४०.७) आणि नागपूरमध्ये ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.