मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSCच्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रं सोशल मीडियावर व्हायरल, आयोगाकडून तात्काळ स्पष्टीकरण

MPSCच्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रं सोशल मीडियावर व्हायरल, आयोगाकडून तात्काळ स्पष्टीकरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 23, 2023 04:10 PM IST

Mpsc exam Hall ticket leak : एका टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेऊन यावर खुलासा केला आहे.

Mpsc exam Hall ticket goes viral
Mpsc exam Hall ticket goes viral

MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. टेलिग्राम या App व लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती तसेच त्यांचे प्रवेशपत्र असा डेटा लिक झाल्याचे बोलले जात आहे. या माहितीनुसार एका टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेऊन यावर खुलासा केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेनंतर एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली आहे. तसेच या प्रकारावर स्पष्टीकरणही दिले आहे. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली असून या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘ब’ आणि गट ‘क’ ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एका टेलिग्राम चॅनलवरील लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रमाण पत्रांचा डेटा लीक झाला आहे. ‘हा फक्त नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉगीन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. शिवाय संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध आहे, असा दावा या लिंकद्वारे करण्यात आला आहे. 

IPL_Entry_Point

विभाग