मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे यांनी ‘पेंग्विन’ असा उल्लेख का केला?

Raj Thackeray : शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे यांनी ‘पेंग्विन’ असा उल्लेख का केला?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2023 03:45 PM IST

Raj Thackeray speech at Gudi Padwa Rally : शिवाजी पार्कच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या 'पेंग्विन' या उल्लेखावरून सध्या चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray speech at Gudi Padwa Rally : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी मुंबईतील शिवाजी पार्क इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मेळावा पार पडला. राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार भाषण केलं. उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यावर टीका करतानाच त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. माहीमच्या समुद्रातील बेकायदा मजारीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी केलेला 'पेंग्विन' हा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात बांधण्यात आलेल्या बेकायदा मजारीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या मजारीचा व्हिडिओ देखील सभेत दाखवला. माहीम पोलीस ठाणे इथून जवळच आहे. महापालिकेची पथकं इथं फिरत असतात. असं असतानाही तिथं बेकायदा बांधकाम केलं गेलं. प्रशासनाच्या बेफिकिरीचा हा परिणाम आहे, असं राज म्हणाले.

‘महाराष्ट्रातील मुसलमानांना तरी हे मान्य आहे का? ही कोणाची समाधी आहे, माशाची? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत केला. त्यावर एकच हंशा पिकला. त्याचवेळी कुणीतरी पेंग्विन असं म्हणालं. त्यावर राज ठाकरे हेही हसत हसत ‘पेंग्विन’ असं म्हणाले. पण नंतर ‘नाही’ असं म्हणून दुसऱ्या विषयाकडं वळले. जावेद अख्तर यांच्यासारखे पाकिस्तानला त्यांच्या तोंडावर सुनावणारे मुस्लिम मला हवे आहेत, असं राज यावेळी म्हणाले.

'पेंग्विन' हे प्रकरण काय आहे?

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना भायखळा येथील प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आणण्यात आले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली होती. पेंग्विन भारतीय वातावरणात राहतील का, असं विचारण्यात आलं होतं. ही संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. तेव्हापासून मनसेचे काही पदाधिकारी व नीतेश राणे हे आदित्य यांना उपहासानं 'पेंग्विन' असं संबोधू लागले. आदित्य ठाकरे यांनी कधीही त्याकडं लक्ष दिलं नाही किंवा त्यांना उत्तर दिलं नाही. कालच्या सभेत थेट राज यांनीच 'पेंग्विन' असा उल्लेख करत स्मितहास्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग