मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gadchiroli Lightning : शाळेतून परतताना अंगावर वीज कोसळल्यानं अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Gadchiroli Lightning : शाळेतून परतताना अंगावर वीज कोसळल्यानं अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 06:30 PM IST

Gadchiroli Lightning News : शाळा सुटल्यानंतर स्विटी घरी जात होती. त्यावेळी वीज अंगावर पडल्यामुळं तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Gadchiroli Lightning News Today
Gadchiroli Lightning News Today (HT)

Gadchiroli Lightning News Today : शाळा सुटल्यामुळं घरी जात असलेल्या मुलीवर काळानं घाला घातला आहे. अंगार वीज पडल्यानं नववीत शिकणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मालेरचक गावात ही घटना घडली आहे. स्वीटी सोमनकर असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वीटी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं चामोर्शीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मालेरचकच्या जिल्हा परिषदची शाळा सुटल्यामुळं घराच्या दिशेनं निघालेल्या स्वीटी सोमनकर या मुलीच्या अंगावर अचानक वीज कोसळली. अंगावर वीज पडल्यानं स्वीटी रस्त्यातच खाली कोसळली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्वीटीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. अंगावर वीज कोसळल्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत गारपीटीसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

IPL_Entry_Point