मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खलिस्तान समर्थक अमृतपालच्या मुसक्या आवळल्या; दीड तास पाठलाग करत पंजाब पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खलिस्तान समर्थक अमृतपालच्या मुसक्या आवळल्या; दीड तास पाठलाग करत पंजाब पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 05:01 PM IST

Amritpal Singh News : सलग दीड तास पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक अमृपालचा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे.

Amritpal Singh News Live
Amritpal Singh News Live (HT)

Amritpal Singh News Live : स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या वारिस दे पंजाब या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अमृतपालला ताब्यात घेतलं असून त्याच्या सहा सहकाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपाल सिंग हा पंजाबमध्ये खलिस्तानच्या समर्थनासाठी चळवळ उभी करत होता. याशिवाय त्याच्या समर्थकांनी पोलिसांवरही हल्ले केल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता पंजाब पोलिसांनी खाक्या दाखवत त्याचा दीड तास पाठलाग करत अमृपालला अटक केली आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग हा पंजाबमधील मैहतपुरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला. पोलीस घटनास्थळी हजर असल्याचं समजताच अमृपालने मर्सिडिज कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा तब्बल दीड तास पाठलाग करत लिंक रोड मार्गावरून त्याला अटक केली आहे. त्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता पंजाबमधील अनेक भागांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अमृतपालच्या एका विश्वासू साथीदाराला पंजाब पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं संतप्त झालेल्या अमृतपाल समर्थकांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. आरोपींवर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं पंजाब पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता जालंधर-मोगा पोलिसांची संयुक्त कारवाई करत अमृतपालसह त्याच्या सहा साथीदारांना बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळं आता पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.

WhatsApp channel

विभाग