मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Lightning: परभणीत अंगावर वीज कोसळल्याने १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Parbhani Lightning: परभणीत अंगावर वीज कोसळल्याने १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 18, 2023 05:45 PM IST

Parbhani Unseasonal Rains: परभणीच्या सोनपेठ तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने एका १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

Parbhani lightning
Parbhani lightning

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात शुक्रवारी (१७ मार्च २०२३) शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास उलटले नाही, तोच आणखी एका मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घडना उघडकीस आली. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यात घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार भागवत (वय, १५) असे अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ओमकार हा परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. ओमकार शुक्रवारी दुपारी शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यानंतर त्याला ताबडतोब रुग्णलयात नेण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान, त्याचा मृत्यू झाला आहे. अवघ्या १५ वर्षाच्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने भागवत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पिकांच्या नुकसानीसह अंगावर वीज कोसळल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी वीज पडून परभणी जिल्ह्यातील चार जण जखमी आणि चार जणांचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यात सध्या गारांचा पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. यातच सध्या सुगीचे दिवस असल्याने बळीराजा आपल्या शेतातील सुगी उरकण्यासाठी जिवाचे रान करतो आहे. त्यामुळे हवामान खात्याने कितीही सावधानतेचा इशारा दिला, तरी शेतकरी हाता तोंडाशी आलेला घास आपल्या पदरात पडावा, यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग