Navi Mumbai Sujan Chemical Factory: नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे उठणारे धुराचे लोट आकाशात दूरवर पसरले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील सुजान केमिकल फॅक्टरीला आज दुपारी आग लागली. सुदैवाने, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
तारापुर एमआयडीसीत एका कारखान्यात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पालघर-बोईसर तारापूर एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्यात हा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण परिसर या घटनेमुळे हादरला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबईतील गोवंडी येथील एका चाळीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नगर परिसरातील बेगनवाडी येथे शनिवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या