मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 23 September Live:

Bombay High Court

Marathi News 23 September Live: दसरा मेळाव्याप्रकरणी कोर्टाच्या निर्णयाचं पुरोगामी पक्षांकडून स्वागत

Marathi News Live Updates: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं जनता दल, शेकाप यांच्यासह डाव्या पक्षांचा सहभाग असलेल्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीनं स्वागत केलं आहे.

Fri, 23 Sep 202201:32 PM IST

IND vs AUS 2nd T20: ओल्या आउटफिल्डमुळे नाणेफेक उशीरा होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या आउटफिल्डमुळे नाणेफेक उशीरा होणार आहे. आता पंच ७ वाजता मैदानाची पाहणी करतील. दरम्यान रात्रीही पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

Fri, 23 Sep 202212:27 PM IST

Dasara Melava: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे प्रागतिक पक्षांकडून स्वागत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं जनता दल, शेकाप यांच्यासह डाव्या पक्षांचा सहभाग असलेल्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीनं स्वागत केलं आहे. शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा ही आज एक परंपरा बनली आहे. याच पक्षानं या मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे प्रथम केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं शिवसेनेला परवानगी नाकारणं अन्यायकारक होतं. परंतु, न्यायालयानं ही चूक दुरुस्त केल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव तसेच मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी म्हटलं आहे.

Fri, 23 Sep 202208:00 AM IST

HC Hearing on Shiv Sena plea: दसरा मेळाव्या संदर्भातील शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणालाही न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचा व महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता एकनाथ शिंदे गट युक्तिवाद करणार आहे.

Fri, 23 Sep 202205:41 AM IST

Yuva Sena: पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये युवा सेनेचे उद्या जनआक्रोश आंदोलन

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळं राज्यातील लाखो तरुण रोजगाराला मुकले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार यासाठी कारणीभूत आहे, असा आरोप करत, राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीनं उद्या, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पुणे जिल्ह्यातील मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. 

Fri, 23 Sep 202204:48 AM IST

 Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता आघाडीवर आहे. याबाबत बोलताना अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, "मी काँग्रेस अध्य़क्षपदाची निवडणूक लढवावी असा निर्णय झाला आहे. आता यासाठी अर्ज कधी करायचा हे लवकरच निश्चित होईल. देशातील सद्यस्थिती पाहता विरोधकांची बाजू भक्कम कऱण्यासाठी हे गरजेचं आहे."

Fri, 23 Sep 202204:32 AM IST

Share Market: शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला

आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून शेअर बाजारात सुरू असलेला विक्रीचा सपाटा कायम असून आजही सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टी दीडशेहून अधिक अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Fri, 23 Sep 202202:04 AM IST

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या आज पुणे दौरा 

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या सोबतच विवध कार्यक्रमांचे उद्घाटन देखील ते करणार आहेत. 

Fri, 23 Sep 202202:01 AM IST

Pune: केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे  आंदोलन

पुण्यातील कोंढवा भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस,जीएसटी तपास यंत्रणांमार्फत छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले . या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज आंदोलन करणार असल्याचा इशारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Fri, 23 Sep 202201:55 AM IST

Pune crime : बंद सदनिका फोडणाऱ्या गुन्हेगाराला अटक ; १० लाखांचा ऐवज जप्त

पुण्यासह ग्रामीण भागामध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Fri, 23 Sep 202201:54 AM IST

Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला आता हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 

Fri, 23 Sep 202201:45 AM IST

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट; मुंबईत बरसणार हलका ते स्वरुपाचा पाऊस

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आजही हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्या नुसार विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.